MAHAD MIDC BLAST saam tv
महाराष्ट्र

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

Mahad MIDC Synergia Chemical Company Reactor Blast Latest News: रायगडच्या महाड MIDC मधील सिनर्जिया केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. रिअॅक्टरच्या स्फोटानंतर 4 ते 5 किलोमीटर परिसरात हादरे जाणवले. दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.

Omkar Sonawane

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड: महाड MIDC मधील सिनर्जिया केमिकल कंपनीत आज सकाळी मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. ओलियम आणि सल्फरची रिअॅक्शन सुरू असताना रिअॅक्टरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, कंपनीच्या परिसरापासून तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. स्फोटानंतर कंपनी परिसरातून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसून आले.

या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, NDRF पोलिस आणि महसूल यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्फोटानंतर अवघ्या दोन तासांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले. दरम्यान स्फोटाची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी कंपनीबाहेर मोठी गर्दी केली.

अपघातग्रस्त कंपनीतील कामगारांची यादी जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. यावेळी पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाकडून घटनेबाबत आणि कामगारांच्या सुरक्षितेबाबत माहिती देण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. घटनेचा पुढील तपास प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

मात्र या दुर्घटनेमुळे महाडच्या औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मागच्या काही वर्षात या MIDC भागात वायू गळती आणि स्फोटांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT