Raigad Breaking saam tv
महाराष्ट्र

Raigad Crime : मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री गाडीवर दरोडा, प्रवाशांना बेदम मारहाण करत लुटलं 15 तोळे सोनं

Raigad News: मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री गाडीवर दरोडा टाकून प्रवाशांना मारहाण करत 15 तोळे सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन कदम, साम टीव्ही

Raigad Breaking: मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री गाडीवर दरोडा टाकून प्रवाशांना मारहाण करत 15 तोळे सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेण सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ हॉटेल मिलन पॅलेस समोर घटना घडली. या ठिकाणी चोरट्यांनी गाडीवर दरोडा टाकत चार ते पाच जणांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेले 15 तोळे सोने लुटले. यानतंर प्रवाशांनी पनवेलमधून 100 नंबरवर फोन करून मदत मागितली. (Raigad News)

या प्रकरणी पेण सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. पेण पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेशण विभाग घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे घटनास्थळाला भेट देऊन आढावा घेणार असल्याची देखील माहिती आहे.(Latest Marathi news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT