महाराष्ट्र

Raigad News : आरोपीनं पोलीस कोठडीतच संपवलं आयुष्य, पत्नीची केली होती हत्या

पत्नीच्या हत्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीनं गळफास घेऊन आत्महत्या केली.

ब्युरो रिपोर्ट, सामटीव्ही

राजेश भोस्तेकर

रोहा: पत्नीच्या हत्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीनं टोकाचं पाऊल उचललं. आरोपीनं पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहा पोलीस ठाण्याच्या कोठडीत आज, गुरुवारी पहाटे ही घटना घडली.

रवींद्र वसंत वाघमारे (वय २५) असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पत्नीच्या हत्या प्रकरणात तो रोहा पोलीस ठाण्याच्या कोठडीत होता. आज पहाटेच्या सुमारास त्यानं कोठडीतच गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेनं रोहा पोलीस ठाण्यासह शहरात खळबळ माजली आहे. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे हे रोहा पोलीस ठाण्यात पोहोचले. या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रोहा तालुक्यातील शेणवई गावातील आदिवासी वाडीवरील रवींद्र वाघमारे याने ९ एप्रिल रोजी पत्नी जयश्री वाघमारे हिची हत्या केली होती. स्वयंपाक करण्याच्या क्षुल्लक कारणावरून रवी याने जयश्रीची कोयत्याने वार करून हत्या केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. रोहा पोलिसांनी आरोपी रवींद्र याचा शोध घेऊन त्याला अटक केली होती. रोहा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत रवीची रवानगी करण्यात आली होती. आज, १४ एप्रिल रोजी रवींद्र याने चादरीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. या आत्महत्या प्रकरणात चौकशी सुरू केली असून, दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT