रायगडमध्ये १७ वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्कार
रायगडच्या म्हसळ्यात घडली घटना
पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल
५ पैकी २ आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती
Raigad Crime News: रायगडमध्ये १७ वर्षीय मुलीवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. ५ आरोपींमध्ये २ आरोपी अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे रायगड जिल्हा हादरला आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. यामधील एक आरोपी पीडित मुलीचा मित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीवर ५ जणांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी म्हसळा पोलिस ठाण्यात पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, एका महिन्यापूर्वीच म्हणजे २३ ऑगस्ट रोजी देखील म्हसळा तालुक्यात एका अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यामुळे एका महिन्यात ही दुसरी घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, तिच्या मित्राने तिला धमकावून आणि फसवून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच एप्रिल ते जून २०२६ दरम्यान, पीडितेच्या घराचे बांधकाम करणाऱ्या एका ४० वर्षीय मिस्त्रीने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत जबरदस्तीने घरात शिरून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी म्हसळा पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच आरोपींपैकी २ आरोपी हे अल्पवयीन आहेत. रायगडमध्ये महिला, लहान मुली सुरक्षित नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.