सचिन कदम साम टिव्ही, रायगड
रायगड (Raigad Accident News) जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कारमधील दोन व्यक्ती या अपघातामध्ये बचावले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. (Latest Accident News)
अपघातामध्ये कारचा चक्काचुर झालाय. पण कारमधील दोन जण बचावले आहेत. एक दूध टॅंकर पुण्याहून मुंबईकडे येत होता. दूध टँकर खोपोली हद्दीत बोर घाट उतरताना लेन बदलत (Accident News) होता. तेव्हा महामार्गावर टँकर कलंडला आणि अपघात झाला. या अपघातग्रस्त टॅंकरने कार आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी टँकरमधील दुध रस्त्यावर सांडलं होतं. अपघातग्रस्त वाहन रस्तावर असल्याने मुंबई लेनवरील वाहतुक बराच काळ बंद होती. अपघातग्रस्त दूध टँकरचा चालकाचा या अपघातात मृत्यु झाला (Accident On Mumbai Pune Expressway) आहे. खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिमने त्वरित बचाव कार्य सुरू केलं आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.
अपघातग्रस्त वाहनांना बाजुला करीत इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला आहे. त्यामुळे आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत झाली आहे. तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला (Mumbai Pune Expressway) आहे. टॅंकर लेन बदलत असताना त्याने कार आणि ट्रकला धडक दिली आहे.
महाबळेश्वरातील आंबेनळी घाटातील घटना
साताऱ्यामध्ये देखील भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. महाबळेश्वरातील आंबेनळी घाटात टेम्पो दरीत कोसळला आहे. मेटतळे या गावाजवळ टेम्पो चारशे फुट दरीत कोसळला ( Road Accident News) आहे. या टेम्पोमध्ये प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. गेला दरीत महाबळेश्वर ट्रॅकरचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. लवकरच घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.