भाजपच्या जिल्हाध्यक्षाच्या जागेत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा ! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: भाजपच्या जिल्हाध्यक्षाच्या जागेत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा !

तब्बल 48 जुगाऱ्यांना अटक करत जवळपास 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तट जिल्हाध्यक्षांसह 50 जणांवर गुन्हा दाखल...

विनोद जिरे

बीड : बीड शहरालगत भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर, सहाय्यक पोलीस (Police) अधीक्षकांसह टीमने रात्री छापा टाकला आहे. यावेळी 48 जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा-

तर त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार (Car), मोबाईल असा जवळपास 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 48 जण पोलिसांच्या ताब्यात असून इतर तिघे फरार असून भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचाही आरोपीत समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

या जुगार अड्डा प्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे सर्व आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी फेटाळले असून ते म्हणाले, की माझा आणि जुगार अड्ड्याचा काहीही संबंध नाही. ती जागा माझ्या मालकीची नाही. सदर जागा माझे भाऊ मदन मस्के यांची आहे. सत्ताधाऱ्यांकडून मला गोवले जात आहे. पोलिसांनी कसलीही चौकशी न करता माझे नाव घेतले आहे. त्यामुळे मी न्यायालयात दाद मागणार आहे, असे म्हणत राजेंद्र मस्के यांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT