Rhuri police, sufi khwaja syed zarif chishti, Nashik saam tv
महाराष्ट्र

Rahuri : अफगाणी धर्मगुरू खून प्रकरण; राहूरीतून तिघांना अटक

राहुरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हाॅटेलवर टाकला छापा आणि संशयित आराेपींना अटक केली.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

sufi khwaja syed zarif chishti : नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात मुस्लिम धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती (sufi khwaja syed zarif chishti) यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्या प्रकरणी राहुरी पोलिसांनी (police) तिघांना अटक केली आहे.

मुस्लिम धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती यांच्या खून प्रकरणात कोपरगाव येथील संतोष ब्राम्हणे याचे नाव समोर आलं होत. तेव्हापासून संतोष देखील फरार होता. बुधवारी रात्री नगर जिल्ह्यातील राहुरी येथे एका हॉटेलमध्ये तो आपल्या दोन साथीदारांसह हत्यारांसह बसला असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी संबंधित हाॅटेलवर जाऊन तिघांच्या मुसक्या आवळल्या. पाेलिलांनी त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व पाच काडतूस हस्तगत केले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संतोष हरीभाऊ ब्राम्हणे, गोपाल निंबा बोरगुले, विशाल सदानंद पिंगळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT