Rahuri Assembly constituency gears up for a crucial by-election after the demise of former MLA Shivajirao Kardile Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra By-Election: राहुरीत महायुतीचा उमेदवार ठरला; महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची चर्चा?

Rahuri Assembly By Election Candidate List: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

Omkar Sonawane

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. आज निवडणूक आयोगाने राहुरी मतदारसंघाच्या पोट निवडणुकीची घोषणा केली आहे.

तर आम्हीही निवडणूक लढायला तयार आहोत; देवेंद्र फडणवीस

बारामती आणि राहुरी पोटनिवडणूकीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल. पण जर आमच्यावर जर निवडणूक लादली गेली तर आम्हीही निवडणूक लढायला तयार आहोत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राहुरी मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन पुढील महिन्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी मध्ये होण्याची शक्यत असून महायुती मधील भाजपकडे ही जागा असल्याने भाजपच्या वतीने स्व.आमदार शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा आहे, तर महाविकासआघाडीचा उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे यांचे नाव घेतले जात आहे. मात्र या ठिकाणी भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला अक्षय कर्डिले सामोरे जातील आणि निश्चित निवडणून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.

तर निवडणुकीला आम्ही सज्ज आहोत गेल्या तीस वर्षांपासून जनतेने स्व.शिवाजी कर्डिले यांना मताच्या रूपाने जे आशीर्वाद दिले आहे त्याच प्रमाणे राहुरी मतदारसंघातील मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आशा भोसले यांचं पार्थिव निवास्थानाकडे रवाना

Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंतला 'कलरफूल' हे नाव कसं पडलं? जाणून घ्या

Diesel Price: डिझेलच्या दरात वाढ होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Buldhana : आधी शॉर्ट सर्किट नंतर सिलेंडरचा स्फोट, अख्ख घर जळून खाक; बुलढाण्यात भीषण दुर्घटना

Monday Horoscope: संगीताकडे आकर्षण वाढेल, 5 राशींना जाणवेल पैशाची तंगी; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT