Rahul Solapurkar  Saam tv
महाराष्ट्र

Rahul Solapurkar: राहुल सोलापूरकरांनी दिला भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा

Rahul Solapurkar Resignation : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्तविधान केल्याप्रकरणी अडचणीत आलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या प्रकरणी एक मोठी बातमी हाती आलीय.

Bharat Jadhav

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर हे अडचणीत आले होते. सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले . सोलापूरसारख्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे. जेथे दिसतील तेथे त्यांना ठेचून काढलं पाहिजे, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी राहुल सोलापूरकरांना सुनावलं.

दरम्यान राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा भांडरकर संस्थेने स्वीकारलाय. राहुल सोलापूरकर हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेचे विश्वस्त होते. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास रंगवला गेला आहे, असा दावा केला होता.

त्यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. राहुल सोलापूरकरांच्या विधानामुळे शिवप्रेमीमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. प्रसिद्धीच्या हव्यासापायी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबत चुकीचे विधान केलं. त्यामुळे विश्वस्त राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मराठा संघटनांनी केला होता.

काय म्हणाले होते अभिनेत राहुल सोलापूरकर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी बोलताना सोलापूरकरांनी हिरकणीचं अस्तित्व नाकारलं. सोलापूरकर म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावे, यासाठी हिरकणीची कथा रचली गेली. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगतात. मात्र हिरकणी घडलेलीच नाही, असा इतिहासाच नसून पण लिहिलं गेलं. तसेच आग्रा येथील सुटकेप्रकरणी बोलतानाही राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.

त्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात शिवप्रेमींनी आंदोलने केली होती. राजकीय वर्तुळातूनही राहुल सोलापूरकरवर टीका केली जात होती. त्यानंतर आज राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेचा राजीनामा दिला होता. दरम्यान शिवद्रोही राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नाक घासून पुण्यात माफी मागितल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाहीत?

सोलापूरकर हा RSS चा दलाल आहे? भांडारकर संस्थेतील ही पिलावळ अशीच वारंवार वळवळ करत राहील. संभाजी ब्रिगेड राहुल सोलापूरकरला सोडणार नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेड यांनी भूमिका घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

SCROLL FOR NEXT