Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : संजय राऊतांना सिल्वर ओकमधून स्क्रिप्ट मिळते... राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार

राष्ट्रवादीची शेतकरी दिंडी आणि उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा हा केवळ राजकीय फार्स आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Radhakrishna Vikhe Patil News: शनिवारी प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटलांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्यी यांची वक्तव्य ही भाजपची ठरलेली स्क्रिप्ट असते असे राऊत म्हणाले होते. यावरच पलटवार करत पाटलांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला, स्क्रिप्ट लिहिणं आणि लिहून दिलेल्या स्क्रिप्टचे वाचन यात संजय राऊत यांना मोठा अनुभव आहे. महाविकास आघाडी सरकार असताना संजय राऊत यांना दिले गेलेल स्क्रिप्ट सिल्वर ओक मधूनच दिले जात होतं, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीची शेतकरी (Farmer) दिंडी आणि उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा हा केवळ राजकीय फार्स आहे. अडीच वर्षे सत्तेत असताना यांना जनतेची आठवण झाली नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. केवळ सत्ता गेल्यामुळेच यांना शेतकरी दिंडी आणि विदर्भ दौरा काढावा लागतोय अशा शब्दात विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सिमा भागात तीव्र लोक भावना असलेल्या गावांमध्ये लक्ष घालणार आहे. विशेष पॅकेज देऊन त्या ठिकाणच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गेली अनेक वर्ष त्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाण साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

SCROLL FOR NEXT