radhakrishna vikhe patil , balasaheb thorat, karad saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थाेरातांच्या 'त्या' भिमगर्जनेवर विखे-पाटलांची बाेचरी टीका

सत्यजित तांबे यांच्या विजयात भाजपचा वाटा आहे हे त्यांनीही मान्य केले आहे.

Siddharth Latkar

Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat : नाशिक पदवधीर मतदारसंघातील विजयाबाबत (Nashik Graduate Constituency Election Result) आपल्याला काय वाटतं, बाळासाहेब थाेरात (Balasaheb Thorat) यांच्याबाबत काय या प्रश्नावर भाजप नेते राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खिंड लढविणारे पळून गेले अशी प्रतिक्रिया दिली. विखे-पाटील आज कराडात (karad Latest News) एका कार्यक्रमासाठी आले हाेते. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले मी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारखा मी एकटा खिंड लढवणार आहे अशी भिमगर्जना केली हाेती. परंतु त्यांनी खिंड सोडुन पळ काढला हे सर्वांनीच पाहिले अशी टीका विखे-पाटलांनी थाेरात यांच्यावर केली.

बाळासाहेब थाेरात यांनी भाजप पक्षात प्रवेश केला तर तुम्ही स्विकारणार का ? या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले माझा काही संबंध येत नाही. पक्ष नेतृत्व ठरवेल त्यांच्या बाबत. बाळासाहेब पक्षात आले तर पक्ष नेतृत्व सांगेल तसे आम्ही करु असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची वेळ ठरली, कृषीमंत्र्यांनी सांगितली तारीख

T20 World Cup : अभिषेक शर्माचा पत्ता कट? या मॅचविरला संधी, सेमीफायनलमध्ये भारताच ११ शिलेदार कोणते?

Crime: दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ५ वीच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, नाशिकच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला

WhatsApp Ban: मोठी बातमी! तब्बल ८२ लाख भारतीयांचे व्हॉट्सअ‍ॅप बंद; कारणही आले समोर | VIDEO

Gajra Hairstyles: महिलांसाठी केसांत गजरा माळणाच्या ५ युनिक स्टाईल, दिसाल एकदम सुंदर

SCROLL FOR NEXT