kolhapur kalamba central jail, kolhapur news saam tv
महाराष्ट्र

Kalamba Central Jail: मोबाईल सापडला... कळंबा कारागृहाची सुरक्षा रामभरोसे; 'येरवडा' च्या अधिका-यांकडून कसून तपासणी

Kolhapur Kalamba Central Jail News: या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातील कळंबा कारागृहात (kolhapur kalamba jail) वारंवार मोबाईल, गांजा सापडत असल्याने या कारागृहाची पुण्यातील येरवडा कारागृहाच्या (pune yerawada central jail) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या कारागृहातील प्रत्येक गोष्ट त्यांनी तपासलेली आहे. (Maharashtra News)

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात गेले अनेक दिवस मोबाईल, बॅटरी, चार्जर तसंच गांजा सापडला आहे. कारागृहात चौक बंदोबस्त असताना या सर्व गोष्टी बंदीजणांपर्यंत पोहोचतातच कशा हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे येरवडा कारागृहातील पाच अधिकारी आणि 25 कर्मचाऱ्यांनी कळंबा कारागृहाची झाडाझडती घेतली.

या कारागृहातील प्रत्येक गोष्ट त्यांनी तपासलेली आहे. एका बॅरॅकेट मध्ये त्यांना पुन्हा मोबाईल सापडलेला आहे. दोन दिवस अधिकाऱ्यांनी ही झाडाझडती केली आहे या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल हे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणार आहेत.

कळंबा कारागृहात अनेक गंभीर आरोपातील बंदीजन बंदिस्त असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. कारागृहाची सुरक्षा रामभरोसे झाल्याने यावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

SCROLL FOR NEXT