Pune Swargate ST Depot Case Update Saam Tv
महाराष्ट्र

Pune Swargate ST Depot Case : आरोपी-पीडितेमध्ये आर्थिक व्यवहार झाला का? दत्ता गाडेच्या वकिलाचा नवा दावा

Datta Gade Pune Case : पुणे स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणी पोलिसांनी दत्ता गाडेची न्यायालयीन सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीनंतर गाडेच्या वकिलांनी आरोपी आणि पीडितेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगितले होते.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला ताब्यात घेतले. या प्रकरणात आज पुणे सत्र न्यायालयाने गाडेला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीच्या वकिलांनी ७,५०० रुपयांचा युक्तिवाद न्यायालयासमोर झाला नसल्याची कबुली दिली.

आरोपी दत्ता गाडेच्या वकीलांनी या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी वकीलांनी दत्ता गाडेने पीडित तरुणीला पैसे दिले होते अशी माहिती दिली होती. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान आजच्या सुनावणीनंतर पुन्हा माध्यमांशी बोलताना गाडेच्या वकिलांनी यांनी पीडिता आणि आरोपी यांच्यात व्यवहार झाला नसल्याचे सांगितले.

'न्यायालयासमोर युक्तिवाद संपल्यावर आरोपी दत्तात्रय गाडेने आम्हाला व्यवहार झाल्याची माहिती दिली होती. त्यावरुनच आम्ही माध्यमांशी बोललो' अशी सारवासारव वकीलांनी केली. एक वकील म्हणून असे बेजबाबदार वक्तक्य करणे किती संयुक्तिक आहे असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला.

७,५०० रुपयांच्या व्यवहारावरुन दत्ता गाडेचे वकील पोटे यांनी विधान केले होते. त्यांनीच ही गोष्ट खोटी असल्याचे कबूल केले. यावरुन त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारले, या प्रश्नांची उत्तरे देणे टाळून पोटे यांनी तिथून काढता पाय घेतला. माध्यमांना हाताशी धरुन समाजात खोटी माहिती पसरवणाऱ्या वकिलावर पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT