Sutarwadi drainage line work underway road collapses  Saam Tv News
महाराष्ट्र

Pune News : पुणे तिथे काय उणे! ड्रेनेजचं काम सुरु असताना रस्ता खचला, ठेकेदार-कामगारांचा काढता पाय

Pune Sutarwadi Drainage Line Work : सुतारवाडी-पाषाण परिसरातील नागरिकांना रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अपघात होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. या नागरिक संतापले आहेत.

Prashant Patil

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुतारवाडी मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. हे काम करत असताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था व पर्यायी वाहतूक व्यवस्था केलेली नाही. या रस्त्यावर काम सुरु असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रेनेज लाईनच्या कामावेळी सुतारवाडी मुख्य रस्ता खचला आहे.

सुतारवाडी-पाषाण परिसरातील नागरिकांना रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अपघात होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. या नागरिक संतापले आहेत. संबंधित ठेकेदाराने कुठलीही सुरक्षा व्यवस्था व वाहतूक व्यवस्था लावलेली नाही. आज शिवनगर सुतारवाडी मुख्य रस्त्यावर संबंधित काम अर्धवट ठेवून ठेकेदार आणि त्याचे कामगार निघून गेले.

भला मोठा खड्डा आणि त्याला कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही आणि तो रस्ता सर्वांसमोरच खचला. अशा प्रकारे पुणे मनपा आणि संबंधित ठेकेदार सुतारवाडी पाषाण मधील रहिवाशांच्या जीवाशी का खेळत आहे? जर या प्रकारे कुठलाही मोठा अपघात झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी संबंधित ठेकेदार व पुणे महानगरपालिकेचे असेल. संबंधित ठेकेदार व पुणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT