Pune Airport expands connectivity with new flights to Solapur, Mangaluru, and Bagdogra starting May 1. saam tv
महाराष्ट्र

Pune-Solapur Flight: अवघ्या ४० मिनिटात सोलापूरहून गाठा पुणे; कधीपासून सुरू होणार विमानसेवा?

Pune-Solapur Flight : पुणे विमानतळ १ मे पासून नवीन विमानसेवा सुरू केली जाणार आहेत. पुणे आणि सोलापूर दरम्यानच्या प्रवासाला आता फक्त ४० मिनिटे लागतील.

Bharat Jadhav

१ मेपासून पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू

अवघ्या ४० मिनिटांत प्रवास शक्य

मंगळुरु आणि बागडोगरासाठीही नवीन फ्लाइट्स

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे विमानतळावरुन तीन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मे पासून पुणे- सोलापूर विमानसेवा सुरू होणार आहे. सोलापूर, मंगळुरु आणि बागडोगरा या शहरांशी पुण्याची पहिल्यांदाच हवाई जोडणी केली जाणार आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे ही विमानसेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरुन आता एकूण १५ नवीन उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या आता २२० वरुन २३५ झालेली आहे. यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.

पुणे ते सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी ही विमान सेवा महत्त्वाची ठरणार आहे. जी स्टार एअर कंपनीकडून दिली जाणार आहे. यात आता पुण्याहून सोलापूरला अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पोहतचा येणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजूर झालेल्या अतिरिक्त १५ स्लॉट्सचा वापर एक मेपासून सुरू केला जाणार आहे. पुण्याहून मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या नव्या मागाँवर उड्डाणे सुरू होणार आहेत. त्याशिवाय,काही मार्गावर विमानसेवेत वाढ होणार आहे.

पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम जाहीर करताना १ मेपासून नवीन स्लॉटचा वापर केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. नवीन स्लॉटला मंजुरी मिळाल्याने एकूण स्लॉट्सची संख्या २२०वरून २३५वर पोहोचली आहे. या स्लॉटचा वापर करून विमानतळ प्रशासने मंगळुरू, सोलापूर, बागडोगरा ही शहरे पुण्यासोबत थेट जोडली आहेत दररोज विमानसेवा असणार आहे.

पुणे - सोलापूर - पुणे फ्लाईट क्रमांक एस ५-३११ /३३२ असा असेल. विमान पुण्याहून ४५ मिनिटांत पुण्याहून सोलापूरला पोहोचेल. या सेवेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील दोन शहरं विमान सेवेने जोडले जाणार आहेत. पुणे ते सोलापूर या दोन महानगरांसाठी ही सातही दिवस सेवा उपलब्ध आहे. सोमवार ते शुक्रवार या काळात सोलापूरहून दुपारी अडीचच्या सुमारास विमानाचे उड्डाण होईल.

हे विमान पुण्यात ४० ते ४५ मिनिटांनी म्हणजे ३ वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. त्यानंतर पुण्याहून हे विमान दुपारी चार वाजता सोलापूरला जाण्यासाठी उड्डाण घेईल. साधारण ४ वाजून ५० मिनिटांनी विमान सोलापुराला पोहोचेल. शनिवारी विमानसेवेच्या वेळेत काही बदल असेल. हे विमान ४ वाजून २० मिनिटांनी विमान पुण्यात दाखल होईल. त्यानंतर सोलापूरला जाण्यासाठी हे विमान पुण्याहून ४ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण भरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT