Shirur News Saam tv
महाराष्ट्र

Shirur News : चोरीसाठी ड्रोनचा वापर करून रेकी; शिरूर परिसरातील प्रकार

Pune News : पुण्याच्या शिरुर तालुक्यातील नागरगाव, आंधळगाव, रांजणगाव, आलेगाव परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन कँमेराच्या माध्यमातून चोरट्यांकडुन चोरी करण्यासाठी रेकी केली जात

रोहिदास गाडगे

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये चोरट्यांच्या टोळ्यांकडुन चोरी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे. परिसरात ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक तपास करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

पुण्याच्या (Pune) शिरुर तालुक्यातील नागरगाव, आंधळगाव, रांजणगाव, आलेगाव परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन कँमेराच्या माध्यमातून चोरट्यांकडुन चोरी करण्यासाठी रेकी केली जात असल्याचा प्रकार केला जात आहे. रात्रीच्या अंधारात ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने या संदर्भात नागरिकांनी पोलीस (Police) ठाण्याशी हि संपर्क केला.  

शेतशिवार परिसरात शेतकऱ्यांचे साहित्य, माल शेतात पडून आहे. (Shirur) यामुळे शेतकरी सध्या भीतीच्या सावटाखाली आहेत. रात्रीच्या सुमारास द्रोण फिरत असल्याने याची चौकशी करून या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत,अजित पवारांचं विमान अपघातात निधन

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCA ची माहिती

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, दुर्घटनेचा पहिला व्हिडिओ अन् फोटो समोर

Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Ajit Pawar: मोठी बातमी! अजित पवारांच्या विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान बारामतीत दुर्घटना, VIDEO समोर

SCROLL FOR NEXT