Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: नियंत्रण सुटले, कार थेट विहिरीत कोसळली; चालकाचा मृत्‍यू

नियंत्रण सुटले, कार थेट विहिरीत कोसळली; चालकाचा मृत्‍यू

रोहिदास गाडगे

शिरूर (पुणे) : शिरुर तालुक्यातील आण्णापुर गावात काळजाचा ठोका चुकविणारी दुदैवी घटना घडली आहे. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्‍याने कार थेट विहिरीत जावून (Accident) पडली. यात चालकाचा जागीच मृत्‍यू झाला. (Letest Marathi News)

रस्त्याने जात असताना कार चालकाचे कारवरील अचानक नियंत्रण सुटले. यामुळे कार अनियंत्रीत झाल्‍याने कार थेट चालकासह विहिरीत जाऊन कोसळली. विहिरीत पाणी असल्‍याने कार चालकाला बाहेर निघता आले नाही. यात चालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. राहुल पठाडे असे मृत कार चालकाचे नाव आहे.

चालकासह कार काढल बाहेर

कार विहिरीत पडल्‍याची बातमी परिसरात लागलीच पसरली. यानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने कारसह चालकाचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी कार चालकाच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT