Shastrinagar Gaurav Ahuja obscene behavior Rupali Patil angry Saam Tv News
महाराष्ट्र

Rupali Patil : पुण्यात बड्या बापाच्या पोरांचं अश्लील वर्तन, किती निर्लज्ज आहे, रुपाली पाटील भडकल्या, पैशांचा एवढाच...

Rupali Patil on Gaurav Ahuja : विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात गुन्हेगारी लोकांची विकृती वाढली आहे. BMW सारख्या गाडीतून उतरुन रस्त्यावर बाथरुम करतोय, किती निर्लज्ज आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका बड्या व्यावसायिक बापाच्या मुलाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. BMW कार चालवणाऱ्या तरुणाचं नाव गौरव मनोज अहुजा असल्याची माहिती आहे. गौरव आणि त्याचा मित्र दारु पिऊन भरधाव वेगात गाडी चालवत होते. भररस्त्यात गाडी थांबवून त्याने तिथेच लघुशंका केली. त्याला हटकल्यानंतर महिलांसमोरच त्याने पॅन्ट खाली करत अश्लील वर्तन केलं. आज शनिवारी सकाळी म्हणजेच ऐन जागतिक महिला दिनीच पुण्यात ही घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

रुपाली पाटील काय म्हणाल्या?

विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात गुन्हेगारी लोकांची विकृती वाढली आहे. BMW सारख्या गाडीतून उतरुन रस्त्यावर बाथरुम करतोय, किती निर्लज्ज आहे. यांना संस्कार नावाची गोष्टच नाहीये. एवढ्या मोठ्या गाडीत बसलाय, शिक्षण तर झालं असणारे, कुठेही सार्वजनिक शौचालयात जाऊ शकला असता, एवढाच पैशांचा माज असेल, तर हॉटेलमध्ये जाऊ शकला असता, पाच रुपयांऐवजी शंभर रुपये देऊन लघुशंका केली असती, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

ही विकृती दिवसेंदिवस फोफावत चालली आहे, माध्यमांनी समोर आणल्यावर पोलीस कारवाई करतील. कारवाई निश्चितच होणार आहे. लोकांनी लक्षात घ्यावं, की आपण असं काही केलं तर, कायद्याची जरब बसणार आहे, एकालाही सोडता कामा नये, पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे पीआय साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या भागावर नियंत्रण आणि लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळं उठसूठ पोलीस आयुक्तांना आम्ही सांगायचं. हे प्रकार चालणार नाही. प्रतिबंधात्मक कारवाई करणं, सीसीटीव्हीवर देखरेख करणं गरजेचं असल्याचं रुपाली पाटील म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT