Pune Rajgurunagar plywood warehouse fire SaamTv
महाराष्ट्र

Pune News : डोंगरावर लागलेल्या आगीचं रुद्ररुप; पुण्यात प्लायवूड गोदामाला भीषण आग, शेजारील वस्तीला धोका

Pune Rajgurunagar Fire Plywood Warehouse : प्लायवूड गोदामाच्या जवळील घरांना देखील आगीचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने आगीने रुद्ररुप धारण केल्याचं समोर आलं आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील खेड तालुक्यातील आसखेड येथील प्लायवूड गोदामाला आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंगराला लागलेल्या वनव्याची आग थेट प्लायवूडच्या गोदामावर आली असून या आगीत प्लायवूडचे गोदाम आगीत जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे. आग लागल्यानंतर परिसरात आगीसह धुराचे लोट दिसत होते.

प्लायवूड गोदामाच्या जवळील घरांना देखील आगीचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने आगीने रुद्ररुप धारण केल्याचं समोर आलं आहे. डोंगर माळरानावर लागणाऱ्या वणव्याच्या घटनांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने डोंगराचा वनवा थेट लोकवस्तीलगत येऊन अशा दुर्दैवी घटना घडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना मदतीचे ट्रक पाठवले; तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेला का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Uddhav Thackeray : मते चोरून सत्तेवर आलात, हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

Wednesday Horoscope: या 3 राशींना बक्कळ पैसा आणि करियरमध्ये मोठी संधी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Shivsena Dasara Melava live: कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही; उद्धव ठाकरेंचा हुंकार

Maharashtra News Live Update: ठाण्यातील टेंभी नाका परिसरात सुप्रसिद्ध देवी ठाण्याची दुर्गे दुर्गेश्वरीचा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT