pune crime news Saam Tv
महाराष्ट्र

Pune Politics: पुण्यात माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला, ६ दिवसांपूर्वी शरद पवार गटात केला होता प्रवेश

Pune Assembly Election 2024: पुण्यामध्ये माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानापूर्वी उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशामध्ये पुण्यात देखील अशीच घटना घडली आहे. पुण्यामध्ये माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरीमध्ये चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. ६ दिवसांपूर्वी त्यांनी रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. रेखा टिंगरे यांनी २०२२ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. परंतु चार महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र ६ दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली. नेमका हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटले का? विरार प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाची कारवाई; नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमधून पावणे दोन कोटी रुपयांची रोकड हस्तगत

Maharashtra Election : मोदीजी, हे ५ कोटी कुणाच्या 'सेफ'मधून निघाले? राहुल गांधींच्या प्रश्नावर विनोद तावडे म्हणाले, तुम्ही स्वतः नालासोपाऱ्यात या!

Maharashtra Election : ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर काय असणार सुविधा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vinod Tawde: विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय-काय मिळालं?

SCROLL FOR NEXT