Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : स्वारगेट बलात्कार प्रकरण; बस प्रशासनाचे मोठे पाऊल; पुणे, पिंपरी चिंचवडमधील बसस्थानकांबाबत महत्त्वाचा निर्णय

Pune Swarget Bus Stand : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारीला रात्री एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला

Rajesh Sonwane

सचिन जाधव
पुणे
: पुण्यातील स्वारगेट अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला. दरम्यान घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर आता बसस्थानकातील सुरक्षेचा अभाव समोर आल्यामुळे आता विविध उपाययोजना करण्यास महामंडळाने सुरवात केली आहे. 

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला होता. तर सदरच्या घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळ प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. सुरक्षितेच्या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागातील बसस्थानकांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. 

१०० बसथांबे संवेदनशील म्हणून निश्चित 

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १४ आगारांतर्गत असणाऱ्या ४२ बसस्थानकांच्या हद्दीतील १०० बस थांबे संवेदनशील थांबे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रतिबंधनात्मक उपायोजना करण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच पुणे शहर आणि ग्रामीण भागातील संवेदनशील बस थांब्यांसाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. यासंबंधीचा पत्रव्यवहार एसटी प्रशासनाने पोलिस आयुक्तांना केला असल्याची माहिती आहे.


रात्री पोलिसांची गस्त वाढविणार 
तसेच चांदणी चौक, कात्रज, रावेत, चांदणी चौकातील बाह्यवळण ओलांडल्यानंतर महामार्गावरील हिंजवडी फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारे आयटी कंपन्यातील प्रवासी कायम असतात. हे प्रवासी रात्री- अपरात्री महामार्गांलगत असणाऱ्या एसटी थांब्यावर बस थांबून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांची गस्तही या परिसरात वाढवणार असल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT