NCP News Saam tv
महाराष्ट्र

NCP News: चुल मांडून केला स्‍वयंपाक; महागाई विरोधात महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

चुल मांडून केला स्‍वयंपाक; महागाई विरोधात महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. यामुळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील महिलांचे स्वयंपाक घरातील आर्थिक घडी कोलमडली आहे. यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात (NCP) राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीने महागाई विरोधात तहसिलदार कार्यालयासमोर गॅस (Gas) बाजुला ठेवुन मातीची चुल मांडुन स्वयंपाक करत अनोखे आंदोलन केले. (Tajya Batmya)

मागील काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरसह इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहेत. यात आता घरगुती गॅस ५० रूपये तर व्‍यावसायीक गॅस सिलेंडरच्‍या दरात ३५० रूपयांची वाढ केली आहे. यामुळे आता गॅस हा न परवडणारा झाला आहे. ग्रामीण भागातील महिलांना पुन्‍हा चुलीवरील स्‍वयंपाक करायची वेळ येणार आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत असून गृहिणीचे घरातील बजेट कोलमडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीकडुन केंद्र आणि राज्य राज्य सरकार विरोधात आंदोलन करत वाढत्या महागाई विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष भारती शेवाळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगलताई चांभारे, दुध संघाचे संचालक अरुण चांभारे, तालुकाध्यक्षा संध्या जाधव, राजगुरूनगर शहराध्यक्ष मनिषा सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT