Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News: चोरट्याकडे सापडले ५ लाखांचे मोबाईल; चोरटा पोलिसांच्‍या ताब्‍यात

चोरट्याकडे सापडले ५ लाखांचे मोबाईल; चोरटा पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुणे शहरातील गर्दीच्या भागात नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यास समर्थ पोलिसांनी (Police) अटक केली. चोरट्याकडून पाच लाख नऊ हजार रुपयांचे २९ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. चोरट्याने मार्केटयार्ड, (Pune) पुणे स्टेशन, स्वारगेट, तसेच पिंपरी-चिंचवड शहरात परिसरात मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. (Live Marathi News)

कुंदनकुमार अर्जुन महातो (वय २५, मूळ रा. साहेबगंज, झारखंड, सध्या रा. अंधेरी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. महातो याने शहरातील गर्दीच्या भागात नागरिकांकडील मोबाइल चोरले असून तो मुंबईहून शहरात मोबाइल चोरीचे गुन्हे करण्यासाठी येत असे. पुण्यातून चोरलेले मोबाइल संच तो झारखंडमध्ये विकणार होता.

समर्थ पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत २९ मोबाइल संच सापडले. चौकशीत त्याने पुणे शहरातील गर्दीच्या भागात नागरिकांकडील मोबाइल संच चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून मोबाइल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT