Pune Market Yard Saam tv
महाराष्ट्र

Pune Market Yard Closed : पुण्यातील मार्केट यार्ड गुरुवारी राहणार बंद, कारण...

पुण्यातील मार्केट यार्ड गुरुवारी राहणार बंद

साम टिव्ही ब्युरो

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे लिंबू विक्रेत्‍यांवर कारवाई झाली होती. बाजारातून लिंबू विक्रेते पूर्णपणे बंद (Pune News) केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर याप्रकरणी अधिकारी, अडते यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. ही कारवाई रद्द करावी; यासाठी बाजार समितीतील (Bajar Samiti) संघटनांनी बंद पुकारला आहे. यामुळे पुण्यातील मार्केटयार्ड गुरूवारी बंद राहणार आहे. (Breaking Marathi News)

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा महिन्‍यांपुर्वी लिंबू विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्‍याचे सांगत लिंबू विक्री बंद केली होती. यामुळे सहा महिन्‍यानंतर माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. हा गुन्‍हा रद्द व्हावा या मागणीसाठी हा निर्णय घेतल्‍याचे सांगितले जात आहे.

संघटनांच्यावतीने पोलिसांना निवेदन

मार्केट यार्डमधील अधिकारी, कर्मचारी व अडत्‍यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी आज सर्व संघटनांच्यावतीने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली असून खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करत एक दिवस बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

MP News : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलीचं निधन, कुटुंबासह पक्षावर शोककळा

Shocking : धक्कादायक! बंद खोलीत आई मुलासह आढळला काकाचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Laxman Hake: ...तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करा, लक्ष्मण हाकेंचे चिथावणीखोर वक्तव्य

SCROLL FOR NEXT