Amruta Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Amruta Fadnavis : मला ट्रोल होण्याची सवय, त्याने मला...; असं का म्हणाल्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याची जोरदार चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Amruta Fadnavis News : अमृता फडणवीस कायम त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. सध्या त्यांच्या या गाण्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ६ जानेवारीला त्यांचं ‘आज मै मूड बणा लेया’ गाणं प्रदर्शित झालं.

गाणं प्रदर्शित होताच काही क्षणात लोकप्रिय झालं. असे असले तरी सोशल मीडियातून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता खुद्द अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमानिमित्त त्या पुण्यात होत्या यावेळी बोलत होत्या.

अमृता फडणवीस यांना त्यांच्या नवीन गाण्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या मला खूपआनंद होतोय, लोकांना गाणं आवडलं त्यांनी ते स्वीकारलं आणि आता लोक माझ्या गाण्यावर रिल्स तयार करत आहे. माझा विश्वास आहे कोणीही काही बोलले तरी काम करत राहिले. मी भजन जरी म्हटलं तरी लोक मला ट्रोल करतील. मला ट्रोल होण्याची सवय झाली आहे त्याने मला काही फरक पडत नाही अशा शब्दात त्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गाणं कसं वाटलं याबद्दलही माहिती दिली आहे. देवेंद्र जी गाणं चांगलं आहे असं म्हणाले. तसेच मला पंजाबी गाणं आवडलं म्हणून ते गाणं केलं असल्याचंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT