Pune Accident Saam tv
महाराष्ट्र

Pune Accident : एसी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग; एकाचा होरपळून मृत्यू

Pune News : पुण्याच्या दिशेने येत असताना सोलापूर- पुणे महामार्गावर एसीने भरलेला कंटेनर यवत येथील हॉटेल साळुंखे मिसळ परिसरात आला असता कंटेनरला अचानक भीषण आग पहाटेच्या सुमारास हि घटना घडली

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : विक्रेत्याने ऑर्डर दिल्याने अशी घेऊन निघालेल्या कंटेनरचा अपघात झाला. एसी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला यवत येथील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल समोर अचानक भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याने बाहेर निघता ना आल्याने कंटेनरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

भिवंडी येथील एका विक्रेत्याने ऑर्डर दिल्याने चेन्नई येथून एसी घेऊन कंटेनर भिवंडीकडे मार्गस्थ झाला होता. दरम्यान पुण्याच्या दिशेने येत असताना सोलापूर- पुणे महामार्गावर एसीने भरलेला कंटेनर यवत येथील हॉटेल साळुंखे मिसळ परिसरात आला असता कंटेनरला अचानक भीषण आग लागली. पहाटेच्या सुमारास हि घटना घडली. कंटेनरला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने कंटेनर रस्त्यावरच उभा केला.  

क्लीनरला होरपळून मृत्यू   

दरम्यान कंटेनरला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने कंटेनर उभा करत क्लीनरला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबत असलेला क्लीनर गाढ झोपेत असल्याने तो उठला नाही. यामुळे कंटेनर चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र क्लीनरला बाहेर पडता न आल्याने त्याचा या आगीत जळून मृत्यू झाला आहे.

कंटेनर मधील सर्वच एसी जाळून खाक 
घटनेची माहिती मिळताच आजुबाजूचे अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु भीषण आग असल्याने लवकर आटोक्यात आली नाही. यामुळे आग विझेपर्यंत कंटेनरसह आतील क्लीनर व एसी असा मुद्देमाल जळून खाक झाला. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी ५५८ कोटींचं बक्षीस, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

IPL 2026: RCBlचं प्लेऑफमधील तिकीट कन्फर्म; पंजाबच्या पराभवानंतर २ संघांची 'चांदी', कसे असणार स्पर्धेचं समीकरण?

Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

ATM मशिन गंडलं, नागरिकांची लॉटरी, 400 रुपयांची मागणी, मिळाले 2 हजार

SCROLL FOR NEXT