BHIMASHANKAR TEMPLE REOPENING UPDATE: RENOVATION NEARS COMPLETION, DECISION EXPECTED BY JUNE 1 Saam Tv
महाराष्ट्र

Bhimashankar Temple : भिमाशंकर मंदिराची कवाडं १ जूनला उघडणार? दर्शनासाठी का होत मंदिर बंद?

Bhimashankar Temple Update News : भिमाशंकर मंदिरातील विकासकामे अंतिम टप्प्यात असून १ जूनपासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत प्रशासनाचा अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे. पाहणी सुरू असून भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

रोहिदास गाडगे

  • भिमाशंकर मंदिरातील विकासकामे अंतिम टप्प्यात

  • १ जूनपासून मंदिर खुले होण्याची शक्यता

  • प्रशासनाकडून अंतिम पाहणी सुरू

  • भाविकांमध्ये दर्शनाबाबत उत्सुकता वाढली

भाविकांसाठी आनंदाची बातमी! भिमाशंकर मंदिरातील सुरू असलेली विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. आज जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने मंदिर परिसराची पाहणी केली जात आहे. या पाहणीनंतरच १ जूनपासून मंदिर दर्शनासाठी खुले करायचे की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भिमाशंकर मंदिरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली होती. या कामांसाठी ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. या काळात मंदिराच्या सभामंडपाचे नूतनीकरण, घुमटाची दुरुस्ती, पायऱ्यांच्या मार्गाचे मजबुतीकरण तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची कामे वेगाने सुरू होती. आता ही बहुतांश कामे पूर्णत्वास येत असून, मंदिर परिसर नव्या रूपात सज्ज होत आहे.

आज होणाऱ्या पाहणीत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, भाविकांच्या गर्दीचे नियोजन, प्रवेश आणि निर्गमन मार्ग, तसेच स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, ३१ मेपर्यंत मंदिर बंद असल्याने शिवभक्तांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विशेषतः जून महिन्याच्या सुरुवातीला मंदिर दर्शनासाठी खुले झाले, तर अनेक भाविकांना दिलासा मिळणार आहे.

भिमाशंकर हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असल्यामुळे येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. जर सर्व व्यवस्था समाधानकारक आढळल्या, तर १ जूनपासून भिमाशंकर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरच शिवभक्तांना नव्या रूपातील मंदिरात दर्शन घेण्याची संधी मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT