Govind Komkar’s brutal murder in Pune reignites Andekar vs Komkar gang war. Rising crime, drug trade, and police failure put the city’s law and order under serious question. Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Pune Under Siege: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला पोलिस प्रशासनाकडून चाप लावण्यात अपयश येतंय. गोविंद कोमकरच्या हत्येनं पुण्यात पुन्हा आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात झालीय? गोविंदची हत्या कशी झाली? हत्येआधी काय घडलं?

Omkar Sonawane

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या गँगवॉरमुळे संपूर्ण पुणे शहर हादरलंय. गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती. त्यानंतर बरोबर एका वर्षानंतर आंदेकर गँगनं त्याच्या हत्येचा बदला घेतलाय.. आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद याची 5 सप्टेंबरला नानापेठ परिसरातील नवरंग मित्रमंडळाजवळ गोळीबार करून हत्या करण्यात आली... आणि पुण्यातल्या टोळीयुद्धानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.. या हत्येवेळी टोळीनं डीजेवर 'टपका रे टपका' हे गाणं वाजवल्याचंही समोर येतयं. गोविंद कोमकर हा वनराज आंदेकरचा भाचा होता. आंदेकर कुटुंबात भावा-बहिणीमध्ये संपत्तीचाही वाद होता. हत्येचा कट कसा रचला

1 सप्टेंबर 2024 ला नानापेठेतल्या डोकेतालीम परिसरात वनराज आंदेकर याचा कोयत्यानं वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी सोमनाथ गायकवाड, गणेश कोमकर, जयंत कोमकर आणि इतर 16 जणांचा समावेश होता. वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळीनं बदला घेण्याची शपथ घेतली. गोविंद कोमकरच्या हत्येआधी आंदेकर टोळीनं आंबेगाव परिसरात रेकी केली. आंबेगाव परिसरात आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह 13 आरोपींची घरे आहेत. त्यामुळे रेकी करण्याच्या संशयावरून दत्ता बाळू काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आंदेकर हत्येचा बदला घेण्यासाठी रेकी केल्याचं समोर आलं.. त्यानंतर हत्येचा कट कसा उधळून लावला, याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.. मात्र रेकी एकीकडे आणि गेम दुसरीकडे असं करून आंदेकर टोळीनं गोविंदची निर्घुण हत्या केली...

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकरसह 11 जणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. आंदेकर विरुद्ध कोमकर टोळीच्या या गँगवॉरमुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांपुढे गँगवॉर थांबवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलयं.. पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना सातत्यानं अपयश येतयं. ड्रग्जचे साठे, कोयत्या गँगच्या वाढत्या कारवायांमुळे सांस्कृतिक राजधानी ही पुण्याची ओळख पुसु लागली आहे. विद्येचे माहेरघर असलेले पुणे शांत राहण्यासाठी गृहखाते कडक पाऊल उचलणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले ब्रिजजवळ दोन कार आणि ट्रकचा भीषण अपघात

Rice Papad Recipe: जेवणासोबत काहीतरी चटपटीत खायचय? घरीच बनवा कुरकुरीत तांदळाचे पापड

Crime : नागपूर हादरले! २३ वर्षीय 'रील स्टार' रिंकीची हत्या, मेकॅनिक नवऱ्याने डोकं फोडलं

Phaltan Doctor Case: ...अन् सगळ्या सुंदर स्वप्नांचा चुराडा झाला, डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर किरण मानेंनी सरकारला धरले धारेवर

Shocking : पनवेल हादरलं! मॅनेजरनं बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला, महिलांचे प्रायव्हेट क्षण कैद केले अन्...

SCROLL FOR NEXT