pune doctor along with women arrested in prostitution case of sambhajingar Saam Digital
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime : वेश्याव्यवसाय प्रकरण; पुण्यातील डाॅक्टरसह महिलेस अटक

हरसूल पाेलिसांची माेठी कामगिरी.

Siddharth Latkar

- Ramu Dhakne

Sambhajinagar Prostitution Exposed :

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय प्रकरणी हरसूल पाेलिसांनी पुण्यातील एका डाॅक्टरसह दलाल असणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता अटकेतील संशयित आरोपींची संख्या 5 वर पाेहचली आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर मधील सेनानगरातील बंगल्यात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा सिडको पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. या प्रकरणात शनिवारी पाेलिसांनी मोठी कारवाई देखील केली होती.

यानंतर संभाजीनगर शहरात बांग्लादेशी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पाेलिसांचा कसून तपास सुरु हाेता. त्यासाठी एक पथक पुण्याला पाठविण्यात आले हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील डॉक्टर अटकेत

हरसुल पोलिसांनी मुलीची तस्करी करून खरेदी विक्री करणाऱ्या पुण्यातील डॉक्टरसह एजंट महिलेला अटक केली. या प्रकरणात अटकेतील आराेपींची संख्या पाचवर गेली आहे. दरम्यान डाॅक्टर आणि महिलेस न्यायालयाने 29 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT