Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case family  Saam Tv News
महाराष्ट्र

Pune News : वहिनी रक्तस्त्राव आणि वेदनेनं विव्हळत होती, मंगेशकर हॉस्पिटलचा निर्दयीपणा; नणंदेनं सांगितला थरारक घटनाक्रम

Pune Tanisha Bhise Death Case : वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत तनिषा भिसे यांच्या कुटुबीयांनी दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्यानं एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. पैसे नसल्यामुळे हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवती महिलेला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी अॅम्बुलन्स मिळू न शकल्यानं महिलेचा नाहक बळी गेल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर मृत तनिषा भिसेच्या नंदेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी नेमकं काय घडलं याबाबतची माहिती दिली आहे.

आम्ही सकाळी नऊ वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे त्यांनी मृत तनिषा भिसे यांचा बीपी चेक केला. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं बीपी हायर साईडला आहे. १०० ते १५० बीपी आहे. त्यानंतर त्यांनी नवील इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर नेण्यास सांगितलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं काही खाऊ नका आम्ही डॉक्टरांना सांगितलं आहे. त्यांची थोडी क्रिटीकल परिस्थिती आहे. आपल्याला सिझर करायला लागू शकतं. त्यामुळे काही खाऊ नका आणि पाणी पिऊ नका. हॉस्पीटलचा ड्रेस चेंज करायला दिला. त्यानंतर डॉक्टर घैसास आले, त्यांना आम्ही तिघे मी, वहिनी आणि भाऊ भेटलो. त्यांनी चेक केलं.

त्यानंतर घैसास आले आणि त्यांनी सांगितलं की, क्रिटिकल सिच्युएशन आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, बीपीही हाय आहे, इमर्जन्सी सिझर करावं लागेल, प्रीमॅच्युअर डिलीव्हरी करायला लागेल. बाळांना सातव्या महिन्यामुळे NICU मध्ये ठेवावं लागेल. NICU चा खर्च प्रत्येक बाळाचा १०-१० लाख रुपये आहे. तुम्हाला आता २० लाख रुपये भरावे लागतील. आम्ही विनंती केल्यावर त्यांनी १० मान्य केले आणि म्हणाले की, तुम्हाला जमत नसेल तर जवळच ससून रूग्णालय आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता, तिथे उपचार चांगले होतात, असं तनिषा भिसे यांची नणंद यांनी सांगितलं.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या महिलेला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश देण्यात आले आहे', असं पालकमंत्री अजित पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT