Pune Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime : शाळेत घुसून पालकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune News : घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून विद्यार्थ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

अक्षय बडवे
पुणे
: शाळेत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर भयंकर प्रकार घडला आहे. यात पालकाने थेट शाळेत प्रवेश करत विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील पौड गावात असणाऱ्या शाळेत घडला आहे. इतकेच नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. सदर संपूर्ण घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुणे जिल्ह्यातील पौड गावात असलेल्या शाळेत हि घटना घडली आहे. शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा सगळा प्रकार २४ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता घडला. यानंतर एका मुलाने घडल्या प्रकारची माहिती घरी जाऊन वडिलांना सांगितली. यानंतर सदर मुलाचे रागातच थेट शाळेत आले. कोणाला काही एक न बोलता वर्गात घुसून मुलाला मारहाण करण्यास सुरवात केली. 

शिक्षकांसमोरच मारहाण 

पालक थेट शाळेच्या आवारात शिरले आणि त्यांनी फिर्यादी यांच्या मुलाला बाहेर बोलवून, शिक्षकांसमोरच मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हि संपूर्ण घटना शाळेच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तर या संपूर्ण प्रकाराबाबत मारहाण करण्यात आलेल्या मुलाने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धमकी 

विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका पालकाने शाळेत शिरून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली आहे. इतकेच नाही तर संबंधित पालकाने विद्यार्थांना शाळेच्या प्रवेशद्वार बाहेर या तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादी मुलाने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT