Pune Crime News Saam TV
महाराष्ट्र

Pune Crime News : खळबळजनक! मनसेतील बड्या नेत्याच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी; नेत्यांच्या मुलांना धमक्यांचे सत्र सुरूच

बाबर यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बदवे

Pune News : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील मनसे नेत्याच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

साईनाथ बाबर हे पुण्यातील एनआयबीएम रोडवरील एका सोसायटीतील राहायला असून त्यांच्याच सोसायटीतील एका महिलेने ही धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हवा पिर खान असे धमकी देणाऱ्या महीलेचे नाव आहे.

बाबर यांचा १६ वर्षाचा मुलगा सोसायटीत खेळत आसताना या महिलेने त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती बाबर यांनी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे.

या आधी देखील मनसेच्या काही नेत्यांच्या मुलांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हे धमकीचं पत्र ठेवलं होतं. "सावध राहा रुपेश" अशा आशयाची चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती. १७ जून रोजी ही धमकी आली होती.

पुण्यातील (Pune) मनसे नेते साईनाथ बाबर हे कायम चर्चेत असतात. कोरोना काळात आपल्या कामामुळे साईनाथ बाबर हे नेहमीच चर्चेत राहिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ तसेच एक कट्टर मनसैनिक म्हणून त्यांची पुण्यात ओळख आहे. अशात त्यांच्या मुलाला धमकी देण्यात आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT