Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News: धमकी देत पैसे मागणाऱ्या तरुणाचा खून; संशयीत पोलिसांच्‍या ताब्‍यात

धमकी देत पैसे मागणाऱ्या तरुणाचा खून; संशयीत पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पैसे मागत होती. पैसे मागणाऱ्या तरुणाला नदीपात्रात ढकलून देऊन खून (Crime News) करण्यात आला हेाता. यातील आरोपीला शिरूर (Shirur) पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. (Live Marathi News)

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील न्हावरे येथे अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पैसे मागणाऱ्या १९ वर्षीय युवकाला मुळामुठा नदीच्या पुलावर घेऊन जाऊन नदीवरून ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यात नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने या युवकाचा खून झाला होता. यात बबलू उर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव असून आरोपीला शिरूर पोलिसांनी अटक केली.

न्हावरे येथील निंबाळकर वस्ती येथे राहणाऱ्या बबलू उर्फ रविराज याचे गावातील एका महिलेची अनैतिक संबंध होते. हे मयत युवक नाना याला माहीत असल्याने तो बबलूला वारंवार पैशाची मागणी करून पैसे उकळत होता. तसेच मी महिलेसोबत (Police) पोलिसात जाऊन तुझ्यावर बलात्काराची केस करेल, अशी धमकी देत होता. त्यामुळे आरोपी धमकीला त्रासला गेल्याने बबलूने २४ मेस मयत नानाला दुचाकीवर बसवून मुळा मुठा नदीच्या पुलावर घेऊन गेला आणि त्याला पाण्यात ढकलून त्याचा खून केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची होणार तपासणी

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT