Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News: बापानेच केला‍ मुलीचा खून; नंतर विषारी द्रव्‍य पिवून आत्महत्येचा प्रयत्न

बापानेच केला‍या मुलीचा खून; विषारी द्रव्‍य पिवून आत्महत्येचा प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. तेरा वर्षीय मुलीचा सख्या बापानेच खून (Crime News) केला आणि तिचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला. त्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Breaking Marathi News)

तनुश्री शिंदे (वय १३) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून (Pune Crime News) स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्दयी बापाने मुलीचा खून केल्यानंतर तनुश्रीचा मृतदेह वाहत्या कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. माहिती मिळाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मागील दोन तासांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत.मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही. विषारी औषध प्राशन केल्याने मयत मुलीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वारगेट पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT