Pune Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime : आरोपीचा सात वर्ष गुंगारा, नाव बदलून वास्तव्य; सापळा रचून पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Pune News : सुनील पवार याने गोखलेगनर भागात सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये किरकोळ वादातून एकाचा खून केला होता. यानंतर याच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

Rajesh Sonwane

सागर आव्हाड
पुणे
: खून करून फरार आरोपी मागील सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. विशेष म्हणजे हा आरोपी आपले नाव बदलून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास राहत होता. दरम्यान पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील काशीगाव परिसरातून अटक केली आहे. 

गोरखनगर येथील सुनील लक्ष्मण पवार (वय ३४) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. सुनील पवार याने गोखलेगनर भागात सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये किरकोळ वादातून एकाचा खून केला होता. यानंतर याच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस (Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र घटनेनंतर तो पसार झाला होता. पोलिसांनी शोध घेतला असता तो सापडला नाही. नाव बदलून तो वेगवेगळ्या भागात वास्तव्यास राहत पोलिसांना गुंगारा देत राहिला. यामुळे न्यायालयाने (Pune Crime) त्याला फरार घाेषित केले. 

अखेर पाठलाग करत पकडले 

दरम्यान पुणे गुन्हे शाखा दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे यांचे पथक गस्त घालत होते. खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी पवार हा ठाणे जिल्ह्यात नाव बदलून वास्तव्यास असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक ठाण्याला रवाना झाले. पोलिसांना पाहताच पवार पळाला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. तो छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव भागात नाव बदलून राहत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्याला चतु:शृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस पुढीलतपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer AC Settings: उन्हाळ्यात AC कितीवर ठेवला पाहिजे? लाईटबिल होईल अर्ध

IPL नंतर टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल, ५ नव्या खेळाडूंची होणार एंट्री, दिग्गजांना मिळणार डच्चू?

Wednesday Horoscope: रागावर ठेवा नियंत्रण, बुधवारी ५ राशी मालामाल होणार; तुमच्या भाग्यात काय?

मोठा रेल्वे अपघात टळला, एकाच ट्रॅकवर २ लोकल; CSMT स्टेशनवर नेमकं काय घडलं?

Weight Loss Recipe : अजिबात वजन वाढणार नाही, 'अशा' पद्धतीने बनवा तुमचा आवडता मँगो शेक

SCROLL FOR NEXT