Pune Crime News saam tv
महाराष्ट्र

Pune Crime: सासूची सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार, कोर्टाचे सुनेला घर खाली करण्याचे आदेश

Pune Crime News: आदेशापासून एक महिन्याच्या आत फ्लॅट खाली करावा. सासूवर कोणत्याही प्रकारचा घरगुती हिंसाचार करू नये. तसेच फ्लॅटवर ताबा सांगू नये, असे निकालात नमूद आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Latest News : सासूने तक्रार केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कोर्टाने सुनेला घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशापासून एक महिन्याच्या आत फ्लॅट खाली करावा आणि सासूवर कोणत्याही प्रकारचा घरगुती हिंसाचार करू नये. तसेच फ्लॅटवर ताबा सांगू नये असे कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. कॅन्टोमेंट न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन. ओंडारे यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणातील सून ही आयटीत नोकरीला करते, तर तिचा पती देखील नोकरदार आहे. मात्र या जोडप्यात वाद सुरू असल्याने पत्नी भाडेतत्त्वावर घर घेऊन राहत आहे. मात्र तीने आपल्याला राहायला घर नाही असे दाखविण्यासाठी सासूच्या नावावर असलेल्या घराचा ताबा घेतला. या प्रकरणातील सासू गृहिणी असून सासरे निवृत्त झालेले आहे. (Breaking News)

दरम्यान सासूने सुने विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची देखील तक्रार दाखल होती. सून सासू-सासऱ्यांना घरात घेत नसल्याचे सासून तक्रारीत म्हटले होते. तसेच ॲड. भरत मोरे यांच्यामार्फत घराचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणातील सूनेला तिच्या पतीने दरमहा ४० हजार रुपये पोटगी द्यावी असा अंतरिम आदेश देखील या न्यायालयाने दिला आहे.

सासूने सांगितले की, सून राहत असलेला फ्लॅट हा गिफ्ट डिडच्या माध्यमातून मिळालेला आहे. मात्र त्या घरात ती राहू देत असल्याने आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे घराचा ताबा मिळावा असे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. सूनेने भाडेतत्त्वावर दुसरे घर घेतलेले आहे, त्यामुळे वृद्ध सासू-सासऱ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळावं हा त्यांचा अधिकार आहे असा युक्तिवाद ॲड. मोरे यांनी केला होता. (Latest Political News)

कोर्टाच्या निकालानंतर अर्जदार सासूचे वकील ॲड. भरत मोरे यांनी सांगितले की, 'महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत. वृद्ध वयात सासू-सासऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने सुनेने घरावर ताबा मारला होता. सून नोकरीला आहे. तिला अंतरिम पोटगी मंजूर झालेली आहे. शिवाय प्रत्यक्षात सून तेथे राहत देखील नाही. तीन भाडेतत्त्वावर घेतलेल्या घराचे कागदपत्र आम्ही सादर केले'. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT