mathadi kamgar leader narendra patil, maratha reservation, maratha morcha, thane, navi mumbai saam tv
महाराष्ट्र

CM Ekanth Shinde यांनी शब्द पाळावा, ...अन्यथा माथाडी कामगार संपावर जातील : नरेंद्र पाटील

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मराठा समाज मतदानावर बहिष्कार टाकेल असा इशारा ठाण्यातील सकल मराठा समाजाने दिला.

Siddharth Latkar

- विकास काटे / सिद्धेश म्हात्रे

Maratha Kranti Morcha Latest Updates : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर झालेल्या लाठीचार्जचा आज (शनिवार) नवी मुंबईसह ठाण्यात मराठा समाजाच्यावतीने निषेध नाेंदविण्यात आला. यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी हल्ल्याची चाैकशी करण्याची मागणी केली. (Maharashtra News)

नवी मुंबईतील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज आणि माथाडी कामगारांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली. याप्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास माथाडी कामगार काम बंद आंदोलन करेल असा इशारा देखील नरेंद्र पाटील यांनी सरकारला दिला. (Maharashtra News)

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील तलाव पाळी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे वंदन करून सरकारचा विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय जवळ मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा असूनही आशा घटना घडत असतील तर त्या निंदनीय असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिलेला शब्द पाळला नाही तर मराठा समाज मतदानावर बहिष्कार टाकेल असा इशारा देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT