Maval Crime News SAAM DIGITAL
महाराष्ट्र

Sangli Crime: हॉटेलच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकत २ महिलांची केली सुटका

Sangli Crime: हॉटेलमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.

साम टिव्ही ब्युरो

विजय पाटील

Sangli News:

सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्टेशन चौक येथील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. यावेळी सांगली आणि इतर जिल्ह्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एजंटला आणि हॉटेल मालकाला अटक करण्यात आलीये. एजंट शोएब आणि लॉज चालक गुरुप्रसाद कृष्णमूर्ती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, महिला एजंट स्वाती ही फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिल्ह्यात जबरदस्तीने महिलांकडून वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांना सांगलीतील स्टार पॅलेस हॉटेलमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसरा बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. यानंतर सापळा रचून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हॉटेल स्टार पॅलेसवर छापा टाकला. यावेळी त्याठिकाणाहून दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी याठिकाणाहून हॉटेल मॅनेजर शोएब मिस्त्री आणि हॉटेल चालक गुरुप्रसाद शेट्टी या दोघांना अटक केली. तसेच दोन महिलांची यातून सुटका केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

Palash Muchhal Net Worth : स्मृती मानधाना की पलाश मुच्छल कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

SCROLL FOR NEXT