Prateek Jayant Patil, Prateek Patil, rajarambapu sahakari sakhar karkhana ltd saam tv
महाराष्ट्र

Prateek Jayant Patil : प्रतीक जयंत पाटील यांच्यासाठी आजचा दिवस ठरणार महत्त्वपूर्ण; जाणून घ्या कारण

जयंत पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी घेत केली होती.

विजय पाटील

rajarambapu sahakari sakhar karkhana : सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून प्रतीक जयंत पाटील (prateek jayant patil) यांची राजकारणात एन्ट्री हाेण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (rajarambapu sahakari sakhar karkhana ltd) अध्यक्षपदावर प्रतिक पाटील यांची वर्णी लागण्याचे संकेत मिळाले आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेस ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्याप्रमाणेच आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतीक जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा होत आहे. इस्लामपूर (islampur) मधील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालक म्हणून निवड झालेल्या प्रतिक पाटील यांची आज कारखान्याच्या अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आज कारखान्याच्या (sugar factory) अध्यक्षपदाची निवड प्रकिया पार पडणार आहे. यात प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते. जयंत पाटील यांच्याही राजकीय जीवनाची सुरुवात कारखान्याच्या माध्यमातूनच झाली होती. सन 1984 साली आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेत केली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT