Prathamesh Pawar Martyred Saam Tv
महाराष्ट्र

अवघ्या 22 व्या वर्षीच साताऱ्याच्या सुपुत्राला जम्मूत वीरमरण

Prathamesh Pawar Martyred : प्रथमेश पवार हे तीन महिन्यांपूर्वीच भारतीय सैन्यदलात भरती झाले होते.

साम टिव्ही ब्युरो

सातारा: सातारा (Satara) जिल्ह्यातील जावली (jawali) तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ (kudal) गावचे जवान प्रथमेश संजय पवार (Prathamesh Pawar) (वय 22) यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. जम्मू सांबा ब्लॉक येथे झालेल्या चकमकीत रात्री 10:30 वाजेच्या सुमारास त्यांना (Prathamesh Pawar Martyred) वीरमरण आले. प्रथमेश यांचे पार्थिव उद्या (रविवारी) बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रथमेश पवार हे तीन महिन्यांपूर्वीच भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. आपण सीमा सुरक्षा दलात नोकरी मिळवायची आणि देशसेवा करायची असं स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच बघितलं होतं. वयाच्या 22 व्या वर्षी प्रथमेश यांनी जीवाची पराकाष्टा करत ते स्वप्न पूर्णही केलं. सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना प्रथमेश यांना वीरमरण आले.

प्रथमेश यांच्या कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजीच्या रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात डयुटीला होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असताना त्यांच्या पायाला गोळी लागली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

प्रथमेश यांनी आपलं प्राथमिक शिक्षण बामणोली तर्फ कुडाळ येथे पूर्ण केलं. त्यानंतर बारावीपर्यंत शिक्षण त्यांनी पाचवड येथील विद्यालयामध्ये पूर्ण केलं. त्यानंतर सैन्यदलात त्यांचे सिलेक्शन झाले. सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना प्रथमेश यांना वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT