Prataprao Jadhav Saam Tv
महाराष्ट्र

आम्हीच भाजपला महाराष्ट्रात हिंदुत्व शिकवलं - प्रतापराव जाधव

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना दोन हात करायला तयार; प्रतापराव जाधव यांचे खुले आव्हान

संजय जाधव

बुलढाणा - भाजपवाल्यांनी (BJP) आम्हाला हिंदुत्वाचे डोस पाजू नये प्रखर हिंदुत्ववादी भूमिका शिवसेनेने पूर्वीपासून घेतली आहे. महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेने (Shivsena) हिंदुत्व शिकवले. भाजपच हिंदुत्व मवाळ आणि राजकारणा पुरत होतं हे जानतेला चांगलं ठाऊक आहे . हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना दोन हात करायला तयार आहे असे खुले आव्हान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी भाजपला दिल आहे.

हे देखील पहा -

महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये एम आय एम सहभागी होणार असल्याच्या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्याप्रमाणात वादंग निर्माण झालं आणि भाजपाने शिवसेनाच्या हिंदुत्ववर प्रश्नचिन्ह निर्माण केला. भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर जहरीली टीका केल्यानंतर शिवसेनेने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजपाने केलेल्या टीकेला शिवसेना नेते प्रत्युत्तर देत आहेत. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, सत्तेसाठी नितीश कुमार, मेहबूबा मुक्ती यांच्यासोबत भाजपने हातमिळवणी करून सत्तेत सहभाग घेतला त्यावेळेस त्यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं असा प्रतिप्रश्न शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी उपस्थित करून हिंदुत्व पाजळून पहा कोणाच्या हिंदुत्वाला किती धार आहे यासाठी भाजपासोबत दोन हात करण्याची तयारी शिवसेनेची असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT