Prashant Koratkar confesses i insulted Chhatrapati Shivaji Maharaj  Saam Tv News
महाराष्ट्र

Prashant Koratkar : 'हो मी अपमान केला'; कोरटकरकडून शिवरायांच्या अपमानाची कबुली, कबुलीनंतर छातीत कळ आली

Prashant Koratkar News : शिवद्रोही प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्यानंतर या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. न्यायालयाने कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टीव्ही

कोल्हापूर : आपणच शिवरायांचा अपमान केला अशी निर्लज्ज कबुली कोरटकरने दिलीय. एवढंच नाही तर कोरटकर कसा पळाला? कोरटकरचा पुढचा प्लॅन काय होता? त्याचेही धक्कादायक खुलासे केलेत. हे खुलासे काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

शिवद्रोही प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्यानंतर या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. न्यायालयाने कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. त्यातच पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरं टाळणाऱ्या मस्तवाल कोरटकरला पोलीसी खाक्या दाखवत ५ तास कसून चौकशी केली आणि तो पोपटासारखा बोलायला लागला. होय...आपणच इंद्रजीत सावंतांना फोन करुन शिवरायांचा अवमान केल्याची कबुली दिलीय. नेमकं प्रशांत कोरटकर काय म्हणाला? पाहूयात.

इंद्रजीत सावंतांना मी स्वतःच फोन केला

गुन्हा दाखल होताच मोबाईलमधील डेटा डिलीट केला

अटक टाळण्यासाठी हैदराबादमार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत

त्यासाठी तेलंगणातील मंचरियाल रेल्वे स्टेशनवर पोहोचला

अंतरिम जामीन रद्द केल्याने मोबाईलचा वापर बंद

फरार असताना ऑनलाईन व्यवहार टाळले

महिनाभरानंतर अटक केलेल्या प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिकला पाठवण्यात आले आहेत. मात्र ही आवाजाची फॉरेन्सिक चाचणी कशी होणार?

आवाजाची फॉरेन्सिक चाचणी

फिर्यादी सावंतांच्या आवाजाचे नमुने घेतले

कोरटकरसह 4 जणांच्या आवाजाचे नमुने घेतले

कसबा बावडा येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी

मुळ संभाषण, आवाजाचा पोत, बोलण्याची पद्धत, स्वर आणि व्यंजनांचा उच्चार याची तपासणी

4-6 दिवसात फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल येणार

आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, त्यानंतर आपण ते बोललोच नसल्याचं सांगत केलेली दिशाभूल आणि आता निर्लज्जपणे आपणच शिवरायांचा अवमान केल्याची कबुली दिलीय. मात्र कोरटकरने कबुली दिल्यानंतर त्याच्या छातीत कळ आली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र कोरटकरच्या छातीत कळ ही तुरुंगवारी टाळण्याची खेळी आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT