PRASHANT KISHOR ADVISES NCP LEADERSHIP CHANGE | INTERNAL RIFT IN MAHARASHTRA POLITICS saam tv
महाराष्ट्र

NCPला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला? प्रशांत किशोर NCPचे नवे सल्लागार?

Prashant Kishor Ncp Leadership Change Sunetra Pawar Meeting: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आता राष्ट्रवादीत मोठे बदल करायला घेतले आहेत....त्यासाठी त्यांनी नवा सल्लागार नेमलाय. कोण आहे हा सल्लागार? या सल्लागारानं राष्ट्रवादीच्या कोणत्या मोठ्या नेत्याला पदावरून हटवायला सांगितलंय? यामुळे राष्ट्रवादीत कसे मतभेद समोर आले आहेत?

Saam Tv

बांकीपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला हरवल्यानंतर प्रशांत किशोर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मदतीला धावून आले असल्याची जोरदार चर्चा रंगलीय. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे पक्षात चुकीचा संदेश जात आहे. म्हणून आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनाच थेट पाचारण करण्यात आलं. मुंबईतल्या 'देवगिरी' निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल 6 तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत प्रशांत किशोरांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्षच बदलण्याची शिफारस केलीय. या बैठकीत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना नेमके काय सल्ले दिले आहेत. ते पाहूयात...

- सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 6 तास बैठक

- राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्त्वात बदलाची प्रशांत किशोर यांची शिफारस

- पक्षात आमूलाग्र बदल करण्यासाठी नेतृत्व बदलाची गरज

- पक्षबांधणीसह संघटनेबाबतही काही सूचना

- प्रदेशाध्यक्षपदावर संघटनात्मक कामात सक्रीय असलेली व्यक्ती असावी

- संघटनात्मक नियुक्त्या आणि घटनात्मक कामावर भर देण्याचा सल्ला

- प्रशांत किशोर यांची टीम NCPसाठी राज्यभर सर्व्हे करणार

- सर्व्हेच्या अहवालानंतर पक्षात मोठे फेरबदल होणार

- पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध पक्षीय कार्यक्रम घेणार

मात्र प्रशांत किशोर यांच्या सल्लागारपदाबाबत आणि त्यांच्या सल्ल्यांसंदर्भात राष्ट्रवादीमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय. तसंच बैठक झाली असली तरी काय चर्चा झाली याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलंय. मुळात प्रशांत किशोर यांनी बांकीपुरच्या पोटनिवडणुकीत विजयी होण्यापूर्वी मुंबईत पवार कुटुंबाची दोनदा भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी राजकीय सल्लागाराचे काम सोडल्याचे सांगितले होतं. मात्र, आता पवार कुटुंबाशी त्यांचा संपर्क कायम असून, भविष्यातही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार असल्याचं दिसतंय.

प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यांमुळे राष्ट्रवादीत उभारी येणार की प्रस्थापितांना धक्का बसणार असल्यामुळे अस्वस्था पसरणार? हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे प्रशांत किशोर भाजपविरोधी असल्यामुळे राज्यातील महायुतीच्या संबंधांवरही परिणाम होणार का याकडेही राजकीय विश्वाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP आंदोलन करणार की थांबवणार, कोर्टाच्या बंधनानंतर दीपके काय करणार?

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT