Prashant Bamb Saam tv
महाराष्ट्र

Prashant Bamb : भाजप आमदाराला विकासकामावरून प्रश्न विचारला; समर्थकांची दोघांना मारहाण; नेमकं काय घडलं? VIDEO

Prashant Bamb Latest News : भाजप आमदाराच्या सभेत गोंधळ झाल्याची घटना घडली. दोन तरुणांनी विकासकामावरून प्रश्न विचारल्याने गोंधळ झाल्याची माहिती मिळत आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे उमेदवारांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. उमेदवारांकडून दिवस-रात्र प्रचार सुरु आहे. राज्याती सर्वच जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीमुळे रंगत वाढली आहे. याच ऐन निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या प्रचारसभेत गोंधळ झाल्याची घटना समोर आली.

दोन तरुणांनी भाजप उमेदवाराला विचारला प्रश्न

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाला. गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथे प्रशांत बंब यांची सभा होती. या सभेमध्ये आकाश केरे आणि योगेश केरे या दोन तरुणांनी प्रशांत बंब यांना विकास कामाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर बंब यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या घटनेनंतर प्रशांत बंब यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

'हे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे घडवून आणताहेत. या एकाच कार्यक्रमात नाही तर आत्तापर्यंत १३ कार्यक्रमात असा गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. मी काय काम केली आहेत, हे जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून ठरवून गोंधळ घातला जातोय, असे प्रशांत बंब यांनी सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमधील गवळीशिवरा येथे काल संध्याकाळी प्रशांत बंब यांची गावकऱ्यांसोबत बैठक आणि सभा सुरू होती. या दरम्यान दोन तरुणांनी प्रश्न विचारला. आमदारांना प्रश्न विचारण्याचाही अधिकार नाही का, असं त्या तरुणांचं म्हणणं आहे. मात्र ते तरुण तेच तेच प्रश्न सातत्याने विचारत होते. शुक्रवारी संध्याकाळी दहाची वेळ संपत असल्याने त्यांना बाजूला करण्याचे सांगितले. त्यांना मारहाण झाली नसल्याचेही बंब यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT