praniti shinde statement on ashok chavan resignation saam tv
महाराष्ट्र

Parniti Shinde : काँग्रेस नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे, भाजपवर प्रणिती शिंदेंचा राेख

आम्हांला कल्पना आहे की आमचा केवळ एक शत्रू आहे ते म्हणजे भाजप. महाविकास आघाडीत असलेले सर्व समविचारी पक्ष हे शेवटपर्यंत राहतील असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

विश्वभूषण लिमये

Praniti Shinde News :

भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेससाठी ही दुर्दैव गोष्ट आहे. भारदस्त नेता होते. भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल करुन लाेक पक्षात आणायचे असा आराेप काॅंग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde latest marathi news) यांनी भाजपावर आज काॅंग्रेस नेते अशाेक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

प्रणिती शिंदे पुढे बाेलताना म्हणाल्या आमच्या राजीनामा बाबतीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत. मी आणि साहेबांनी (सुशीलकुमार शिंदे) याबाबतीत स्पष्टीकरण दिलेला आहे.

अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. ते पुढे काय करणार हे आता त्यांनी सांगितलेलं नाही. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी आमदार होत्या. त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.

त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही, पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अजून ही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे, हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT