प्रणिती शिंदेंनी खबऱ्यांचे पगार वाढवावेत; फारुख शाब्दी विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

प्रणिती शिंदेंनी खबऱ्यांचे पगार वाढवावेत; फारुख शाब्दी

कॉंग्रेसचे नेते काम करत नाहीत, तर उलट एमआयएम पक्षाला का दोष देता? आम्हाला बी टीम म्हणायचे सोडून द्या.

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर : कॉंग्रेसचे Congress नेते काम करत नाहीत, तर उलट एमआयएम MIM पक्षाला का दोष देता? आम्हाला बी टीम म्हणायचे सोडून द्या. जनतेला सर्व कळाले आहे, की तुम्हीच भाजपची BJP बी टीम आहात. कॉंग्रेस पक्षामधील Party निवडून आलेले आमदार MLA, खासदार, मंत्री, भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. Praniti Shinde should increase the salaries of those inform

यामुळे भाजपचे मिशन लोटसही पूर्ण होत आहे. कॉंग्रेसने आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे. तुमच्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर का फोडता? कॉंग्रेसचे भाजपची ए टू झेड टीम असल्याचा टोला एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी प्रणिती शिंदेंना लगावला आहे.

हे देखील पहा-

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे Praniti Shinde यांनी एका कार्यक्रमात एमआयएमला मत म्हणजे भाजपला मत असल्याचे वक्तव्य केले होते. ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, "शहर मध्यमधून २०१९ ची विधानसभा निवडणूक मी लढविली. माझ्या विरोधात कॉंग्रेसने प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांना आणले होते. Praniti Shinde should increase the salaries of those inform

मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मग मला सांगा, भाजपची बी टीम कोण आहे, असा सवाल शाब्दी यांनी उपस्थितीत केला आहे. कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या खबऱ्यांच्या पगारी वाढवाव्यात, कारण हे खबरी आपणास चुकीची माहिती देत आहेत. राजकारण करावे, मात्र खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

मुस्लिम बांधवांना कुराणची शपथ देऊन, त्यांना जलील करू नका. आम्हाला आता बी टीम म्हटल्यावर फरक पडत नाही. आम्ही जनतेचे काम करून निवडून येऊ,असा विश्‍वासही शाब्दी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाउनमध्ये ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाने २० हजार कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले आहे. अनेक दवाखान्यांना पीपीई किट, नागरिकांना मास्क वाटप केले आहे. एमआयएमने जेवढे काम केले तेवढे काम कोणत्याच नेत्यांनी, पक्षांनी केले नाही. यापुढेही गरिबांसाठी काम करणार असल्याचेही शाब्दी यांनी सांगितले आहे. Praniti Shinde should increase the salaries of those inform

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT