Praniti Shinde News: Saamtv
महाराष्ट्र

Praniti Shinde News : भाजप कार्यकर्त्यांकडून कारवर हल्ला; आमदार प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Praniti Shinde News in marathi : लोकसभा निवडणुकासाठी प्रणिती शिंदे या गावोगावी भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान, सोलापुरातील सरकोली गावात कारवर हल्ला झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

विश्वभूषण लिमये

Praniti Shinde News in Marathi :

भाजपच्या कार्यकत्यांनी कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकासाठी प्रणिती शिंदे या गावोगावी भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान, सोलापुरातील सरकोली गावात कारवर हल्ला झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. या आरोपानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. (Latest marathi News)

काँग्रेसने आज गुरुवारी लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर केली. या यादीत प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यामुळे शिंदे यांनी नागरिकांच्या भेटीगाठी सुरु केल्या होत्या. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सरकोली गावात गेल्या, त्यावेळी त्यांच्या कारवर हल्ला झाला. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, 'सरकोली गावात भेटीगाठी सुरु आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. काही गावात मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी आहे. त्या आंदोलनाचा मी आदर करते. पण भाजपची लोक आंदोलनाचं नाव घेऊन पुढे येत आहेत. या भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर आणि कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कार फोडण्याचा प्रयत्न केला'.

'भाजप कार्यकर्त्यांची मर्यादेच्या बाहेर वर्तवणूक सुरु होती. त्यामुळे मी कारच्या बाहेर उतरून त्यांना कारला हात न लावण्यास सांगितलं. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. ते आंदोलक नसून भाजपचे कार्यकर्ते होते. आम्ही त्याचा निषेध करतो. या घटनेची मनोज जरांगे यांनीही नोंद घ्यावी,असे त्या पुढे म्हणाल्या.

'मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अशा गोष्टी केल्या जात आहेत. मराठा समाजाने पुकारलेल्या गावाबंदीला समर्थन आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT