Ramdas Athawale on Prakash Ambedkar Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale News: प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो; रामदास आठवलेंचे आवाहन

Ramdas Athawale on Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही...असे अवाहन रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे.

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Political News: प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो, आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही...असे अवाहन रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे. शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवले यांनी हे आवाहन केलं आहे. (Latest Marathi News)

प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. मात्र रिपाई ज्यांच्या बाजूने असते त्यांनाच सत्ता मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे मी त्यांना भाजपकडे (BJP) घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदींसोबत राहू. तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राहू नये, ते कसे आहेत मला माहित आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागतच असल्याचे रामदास आठवले म्हणाले. त्याचबरोर 'महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमुठ आणि रोज करत आहेत सगळ्यांची लूट' असा आपल्या खास शैलीत आठवले यांनी मविआचा समाचार घेतला आहे. (Political News)

अधिवेशनादरम्यान बेशिस्त कार्यकर्त्यांना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. रिपब्लिकन पक्षाचा बाजार करू नका. इतर पक्षांमध्ये तुम्ही अशा पध्दतीची वर्तणूक पाहिली का? नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी आणि घोषणाबाजी करून पक्ष वाढणार नाही. बेशिस्तपणामुळे पार्टीचा सत्यानाश झाला असून हे थांबले नाही तर अशा लोकांना पक्षातून काढून टाकीन. अशा शब्दात आठवले यांनी कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT