Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यास तयार; प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य

Prakash Ambedkar On Maratha Aarakshan: त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं. ते घात करतील, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

बालाजी सुरवसे

Maratha Aarakshan News:

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. असे असले तरी या दोन्ही समाजात मी मध्यस्थी करण्यास तयार आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचं असून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं. ते घात करतील, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.

जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बोलताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, मनोज जरांगे ज्या आंदोलनात चालतात, त्या आंदोलनात त्यांनी मोजकी लोकं सोडून सामान्य लोकात जेवण केलं पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

भारत देशात धर्माचा प्रचार प्रसार करायला पाहिजे. पण त्या अगोदर आपण कुठल्या पदावर आहोत हे पाहायला हवे. रामाची प्राणप्रतिष्ठा करायला विरोध नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. पण आपले पंतप्रधान पद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

रोहित पवारांनाही दिला सल्ला

आपण काही केलं असेल तर घाबरू नका. आपली संपत्ती जाहीर करा, असं मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी रोहित पवार यांच्या ईडी कारवाईवरून व्यक्त केले आहे. प्रकाश आंबेडकर हे आज धाराशिव येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT