Chandrakant Patil Saam TV
महाराष्ट्र

Chandrakant Patil: “फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळांसाठी भीक मागितली” म्हणणाऱ्या पाटलांचे प्रकाश आंबेडकरांनी केले अभिनंदन, कारण ?

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पाटलांच्या वक्तव्यावर सूचक टीका करत जाहीर अभिनंदन केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chandrakant Patil: गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. आधी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याने राजकारण तापलं होतं. अशात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे अभिनंदन करत सूचक टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पाटलांच्या वक्तव्यावर सूचक टीका करत जाहीर अभिनंदन केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, " चांगलं स्टेटमेंट आहे. त्यांनी एवढं तरी सिद्ध केलं की, बाबसाहेब असतील, महात्मा फुले असतील किंवा मग भाऊराव पाटील असतील यांनी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. मात्र यावेळी त्यांनी हेगडेवार आणि गोळवलकरांच नाव यात घेतलं नाही. याचा अर्थ त्यांनी लोकांकडून पैसे घेतले नाही. म्हणजे आताच्या भाषेत त्यांनी खोक्यांच्या माध्यमातून पैसे घेतले आणि आपल्या संस्था उभ्या केल्या. ही कबुली चंद्रकांत पाटलांनी दिल्याने आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करत आहोत."

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी देखील बोचरी टीका केली आहे. " तुमच्यासारखे भिका** आमचे महापुरुष नव्हते. तुम्ही मंत्रीपदासाठी काय भिक मागितली हे महाराष्ट्राला माहिती आहे. पाटलांच वक्तव्य महापुरुषांचा अपमान करणारं आहे. अशा लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे." अशी टीका मिटकरींनी केली.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

"कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा (School) सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. यावेळी सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. तेव्हा त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा सुरु करायच्या आहेत, पैसे द्या. तेव्हाच्या काळात लोकांनी १० रुपये दिले. आता १० कोटी देणारे लोक आहेत" असं वक्तव्य त्यांनी केलं. पैठणमध्ये (Paithan) एका सभेला संबोधीत करताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT